बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील सात आरोपींविरोधात आता NSA अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई होणार आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर मध्ये उसळलेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांचा मृत्यू झाला. तसेच सुमित नावाच्या एका तरूणाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी स्याना पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. एक एफआयआर गोहत्येसंदर्भात करण्यात आली आहे. तर दुसरी हिंसाचारप्रकणी ५० ते ६० अज्ञातांविरोधातली आहे अशीही माहिती समजते आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ५० जण फरार आहेत. ज्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे.

बुलंदशहर या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारामध्ये पोलीस इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांची हत्या झाली. तर आणखी एक तरुण मारला गेला होता. 3 डिसेंबरला झालेल्या या हिंसाचार प्रकरणी आत्तापर्यंत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारातील गुन्हेगार शोधण्यासाठी विशेष तपास पथकही स्थापण्यात आलं आहे.