06 July 2020

News Flash

बुलेट ट्रेनचा इतिहास

१९६४ सालच्या ऑलिम्पिक्स वेळी जपानमध्ये बुलेट ट्रेनची संकल्पना अस्तित्वात आली.

बुलेट ट्रेन ऐवजी देशात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा असे मत एका वाचकाने व्यक्त केले आहे.

१९६४ सालच्या ऑलिम्पिक्स वेळी जपानमध्ये बुलेट ट्रेनची संकल्पना अस्तित्वात आली. टोकियो आणि ओसाकादरम्यान ही सेवा सुरू केली गेली.

’इटली देशाने १९७८ साली रोम आणि फ्लोरेन्सदरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा रेल्वे रुळांची निर्मिती केली आणि अतिवेगवान रेल्वेच्या संकल्पना अस्तित्वात आणण्याची मुहूर्तमेढ युरोपमध्ये रोवली.
’कोणत्या देशात बुलेट ट्रेन धावतात – ऑस्ट्रीया, बेल्जियम, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, दक्षिण कोरीया, स्पेन, स्वीडन, तैवान, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि उजबेकिस्तान.
’जगातील एकमेव युरोप देशामधील अतिवेगवान रेल्वेने आंतरराष्ट्रीय सीमा पार केल्या आहेत. तर जगभरातील अतिवेगवान रेल्वेच्या जाळ्यापैकी ६० टक्के भाग चीनने व्यापला आहे.
’दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी आधुनिक अतिवेगवान रेल्वेसाठीचे प्रयत्न करण्यास सुरुवात झाली.
’जगातील पहिल्या पाच बुलेट ट्रेन –
१. शांघाय मागलेव – (Shanghai Maglev) जास्तीत जास्त वेग ताशी ४३० किमी आणि कमीत कमी वेग ताशी २५१ किमी – २००४ सालापासून सुरू -शांघाय मागलेव ते शांगाय पुदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत (Shanghai Maglev to Shanghai Pudong International Airport)
२. हारमोनी सीआरएच ३८० ए – (Harmony CRH 380A) ताशी ३८० किमी ह्य़ुएन ते गुंनगेजहो (Wuhan to Guangzhou)
३. एजीव्ही लटालो- (AGV Italo) – ताशी ३६० किमी – युरोपमधील नापोली- रोम- फिरेन्जे- बोलोगना – मिलोना कॉरिडॉर या शहरांना जोडते. (Napoli – Roma – Firenze – Bologna – Milano corridor)
४. सीमेन्स वेलारो ई / एव्हीएस १०३ – (Siemens Velaro E / AVS 103) – वेग ताशी ३५० किमी प्रति तास – स्पेनमधील बार्सेलोना आणि मॅद्रिजदरम्यान धावते. Barcelona-Madrid line..
५. टालगो ३५० (टि ३५०)- ((Talgo 350) ) – ताशी ३५० किमी – २००५ सालापासून स्पेनमधील मॅद्रिद- झारागोजा-लिइदा ते मॅद्रिद बार्सेलोनादरम्यान धावते. (Madrid-Zaragoza-Lleida to Madrid-Barcelona)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 3:08 am

Web Title: bullet train history
टॅग History
Next Stories
1 आयसिसचा बीमोड करण्याचा हिलरी क्लिंटन यांचा निर्धार
2 मेक इन इंडियासाठी जपानाची वर्षांला १२ अब्ज डॉलरची तरतूद
3 ‘जागतिक तापमानवाढीची मर्यादा दोन अंश सेल्सियसपर्यंत’
Just Now!
X