News Flash

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत महाभरती; परीक्षा घेतली जाणार नाही

८ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

संग्रहित छायाचित्र

सरकारी नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागातील चार हजार पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करण्यास अद्यापही संधी आहे. दक्षिण-मध्य रेल्वेने एकूण ४ हजार १०३ पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत. इच्छुकांना ८ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसाठी आरक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता दहावील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

रेल्वेकडून ‘अप्रेंटिस’ पदाच्या एकूण ४ हजार १०३ पदांची भरती केली जात आहे. यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण व आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराचे किमान वय १५ असावे, तसेच ८ डिसेंबर २०१९ रोजी तो २४ वर्षांचा नसावा. कमाल वयोमर्यादेत एससी/एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची तर ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

इयत्ता दहावीतील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी उमेदवारांनी  http://104.211.221.149/instructions.php संकेतस्थळास भेट द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:19 pm

Web Title: bumper vacancies for 10th pass in railway msr 87
Next Stories
1 Video: एका उडीत मांजरीने ओलांडली नदी; पाहा थक्क करणारा व्हिडिओ
2 जेव्हा पाकिस्तानी खेळाडू भारतीय टॅक्सी चालकाला म्हणतात, चलो हमारे साथ खाना खाने !
3 देवभोळा चोर! आधी केली दुर्गादेवीची पूजा आणि मग चोरले दागिने
Just Now!
X