केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले असून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक- महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली आहे. तर सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

गृह सचिव पदाचा गुरूवारी राजीनामा देणारे राजीव महर्षी आता कॅगचे प्रमुख राहतील. ते शशिकांत शर्मा यांची जागा घेतील. ते १९७८ च्या राजस्था केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्याचबरोबर डेप्यूटी कॅगपदी रंजनकुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयएएस अधिकारी सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तीपदी नेमण्यात आले आहे. नसीम झैदी हे जुलै महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यानंतर अरोरा पदभार स्वीकारतील.

तर अनिता करवाल यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजीवकुमार यांना अर्थ सेवा विभागाचे सचिव तर आशा राम सिहाग यांना अवजड उद्योग विभागाचे सचिव म्हणून नेमले आहे.