11 December 2017

News Flash

बस दरीत कोसळून ८ ठार तर २० जखमी

सोलन येथून ५० किमी असलेल्या डोलारघाट येथे ही बस दरीत पडल्याची माहिती पोलिसांनी दिली

हिमाचल प्रदेश | Updated: June 12, 2016 12:00 PM

खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ ठार तर २० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोलन येथून ५० किमी असलेल्या डोलारघाट येथे ही बस दरीत पडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चिरगाव ते मंडी ही खासगी बसमध्ये ४० प्रवाशी होते. डोलारघाटात ती सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. मृतांमधील चौघांची ओळख पटली असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डीएसपी नरवीर राठोड यांनी सांगितले. या घटनेनंतर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि वाहतूक मंत्री जी.एस. बाली यांनी शोक व्यक्त केला.

First Published on June 12, 2016 11:59 am

Web Title: bus falls into gorge eight killed 20 injured