01 March 2021

News Flash

उद्योगपती अनिल अंबानी आता धनाढ्य नाहीत!

ब्रिटनच्या न्यायालयात अंबानींच्या वकिलांची माहिती

(संग्रहित छायाचित्र)

रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे एकेकाळी धनाढय़ उद्योगपती होते, मात्र भारतातील दूरसंचार बाजारपेठेत अनर्थपूर्ण घडामोडी घडल्याने अंबानी आता धनाढय़ नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयात स्पष्ट केले.

चीनमधील अग्रगण्य बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडून ६८० दशलक्ष डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्याबाबतच्या सुनावणीच्या वेळी वकिलांनी वरील बाब न्यायालयात स्पष्ट केली.

अनिल अंबानी यांनी २०१२ मध्ये ९२५ दशलक्ष डॉलरच्या कर्जाला वैयक्तिक हमी दिली होती. त्याबाबतचा तपशील देण्याची मागणी दी इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि., मुंबई शाखा, चायना डेव्हलपमेण्ट बँक आणि एग्झिम बँक ऑफ चायना यांनी केली आहे. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही हमीसाठी अधिकार दिल्याचा अनिल अंबानी यांनी इन्कार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:22 am

Web Title: businessman anil ambani is no longer rich abn 97
Next Stories
1 बोडो कराराने आसाममध्ये शांततेची पहाट – मोदी
2 दिल्ली सामूहिक बलात्कार : आरोपींची फाशी पुन्हा लांबणीवर
3 मोदींकडून केरळचा चुकीचा संदर्भ
Just Now!
X