करामती बल्ब आहे असं सांगून तिघांनी एका व्यापऱ्याला ९ लाखांना गंडवल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या दिल्लीत घडली आहे. हा बल्ब सोनं आणि त्यासारख्या मौल्यवान धातूंना आकर्षित करणारा बल्ब आहे असं या तिघांनी या व्यापाऱ्याला सांगितलं. तसंच यामुळे तुमची भरभराट करेल असंही या तिघांनी या व्यापाऱ्याला सांगितलं. मात्र हा करामती बल्ब वगैरे काहीही नव्हता तर साधा एलईडी बल्ब होता. जो या व्यापाऱ्याला ९ लाखांना विकण्यात आला. ज्या तिघांनी या व्यापाऱ्याला ९ लाखांना गंडा घातला ते तिघेही लाखिमपूर खेरीचे रहिवासी आहेत.
त्यांनी या व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला आणि मग त्याला बल्ब विकला. या बल्बमध्ये काही खास गोष्टी आहेत त्यामुळे हा बल्ब करामती आहे हे त्यांनी या व्यापाऱ्याला पटवून दिलं. या व्यापाऱ्याला करोना आणि लॉकडाउनमुळे बराच तोटा झाला होता त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी त्याने ९ लाखांचा हा बल्ब घेतला खरा मात्र त्यामुळे आर्थिक अडचणीतून त्याला गंडवणारे तिघे बाहेर आले हा व्यापारी नाही.
बरेलीतल्या या व्यापाऱ्याने चुटकन खान, मासूम खान आणि इर्फान खान या तिघांविरोधात तक्रार नोंदवली आहे. करोना आणि लॉकडाउन यामुळे या व्यापाऱ्याला बराच तोटा झाला होता. या तिघांनी त्याला बल्बमुळे तुझी भरभराट होईल अशी खोटी आशा दाखवली त्यामुळे तो भुलला. आता याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 4:43 pm