News Flash

करोनाची दहशत! रस्त्यावर पडलेल्या २५ हजार रुपयांना कोणीच हात लावेना

करोना व्हायरसच्या भीतीमुळे रस्त्यावरील नोटांच्या बंडलला कोणीच हात लावण्याची हिंमत केली नाही.

प्रतिकात्मक छायाचित्र

जर चुकून तुमच्या पाकिटातून १०० रुपयांची नोट रस्त्यावर पडली तर ती तुम्हाला परत मिळणं अशक्यच असतं. आता जर १०० च्या जागी तब्बल २५ हजार रुपये असते तर? पण करोनाच्या भीतीमुळे ज्या व्यक्तीच्या खिशातून हे २५ हजार रुपये रस्त्यावर पडले, ते त्याला सुखरुप परत मिळाले आहेत. बिहारमध्ये घडलेली ही घटना आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार गजेंद्र शाह या व्यावसायिकाच्या खिशातून नोटांची बंडल रस्त्यावर पडली होती. “माझ्या खिशातून काहीतरी काढत असताना १५ हजार रुपयांची बंडल रस्त्यावर पडली. मला ती नोटांची बंडल जशीच्या तशी परत मिळाली. कारण करोना व्हायरसच्या भीतीमुळे त्याला कोणीच हात लावण्याची हिंमत करू शकला नाही. एका सज्जन व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि ती रक्कम उचलण्यास सांगितली,” असं गजेंद्र शाह म्हणाले. मधेपुरा जिल्ह्यात ही घटना घडली.

‘रस्त्यावर पडलेलं नोटांचं बंडल पाहून काही लोक जमा झाले होते, पण त्याला हात लावण्याचं धैर्य कोणालाच होत नव्हतं. करोना व्हायरसची दहशत लोकांमध्ये होती. त्यामुळे त्यातल्या एकाने किशनगंज पोलीस ठाण्याला फोन करत ही बाब सांगितली’, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सर्व खातरजमा केल्यानंतर गजेंद्र यांना त्यांचे पैसे परत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 11:49 am

Web Title: businessman loses rs 25 thousand rupees gets it back due to coronavirus scare ssv 92
Next Stories
1 Lockdown : गोव्यातील बिअर शॉपधारकांना स्टॉक संपण्याची भीती
2 उत्तर प्रदेशात सामूहिक हत्याकांड : आरोपीने संपत्तीच्या वादातून आई-वडिलांसह भावाच्या परिवाराला संपवलं
3 महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात पोहोचलेले ७ कामगार निघाले करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X