News Flash

रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी ५ बँकांचे ५०० कोटी बुडवून पसार

नीरव मोदी प्रकरणानंतर आणखी एक प्रकरण उघड

विक्रम कोठारी (संग्रहित छायाचित्र)

पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदी ११ हजार कोटींचा चुना लावून गेल्याची बातमी ताजी असतानाच रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी याने पाच बँकांना पाचशे कोटींचा चुना लावून पलायन केल्याची बातमी समोर आली आहे. पान परागचे मालक एम. एम. कोठारी यांचा मुलगा विक्रम कोठारी याने पाच सरकारी बँकांमधून ५०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आणि तो पळाला आहे.

रोटोमॅक कंपनी कानपूरमध्ये आहे, त्याचा मालक विक्रम कोठारीने अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक या बँकांना ५०० कोटींचा चुना लावल्याचे उघड झाले आहे. ‘फर्स्ट पोस्ट’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

विक्रम कोठारीने ४८५ कोटींचे कर्ज युनियन बँकेकडून घेतले होते. तर अलाहाबाद बँकेकडून ३५२ कोटींचे कर्ज घेतले होते. हे कर्ज घेऊन एक वर्ष उलटले तरीही व्याजही दिले नाही किंवा कर्ज परतही केले नाही. धक्कादायक बाब म्हणजे कानपूरच्या सिटी सेंटर मधील रोटोमॅकचे ऑफिस गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. कर्ज घेतल्यापासून विक्रम कोठारी फरार आहे त्यांच्याबाबत कोणालाही माहिती नाही असेही समजते आहे. त्यामुळे पाच बँकांना ५०० कोटी पेक्षा जास्त रकमेचा चुना लागला आहे

कोठारी यांनी घेतलेले कर्ज वेळेत परत दिले नाही तर त्यांच्या संपत्तीची विक्री करून पैसे परत मिळवले जातील असे अलाहाबाद बँकेचे मॅनेजर राजेश कुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. विक्रम कोठारीने नियम धाब्यावर बसवून कर्ज घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे.

कोण आहे विक्रम कोठारी?

पान पराग या पान मसाला कंपनीचे संस्थापक एम एम कोठारी यांचा मुलगा आहे विक्रम कोठारी

वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रम कोठारीने स्टेशनरीचा व्यवसाय सुरु केला

रोटोमॅक पेन, स्टेशनरी आणि ग्रिटिंग कार्ड त्यांच्या कंपनीत तयार होत होते

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते विक्रम कोठारींना गौरवण्यात आले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 7:52 am

Web Title: businessman vikram kothari absonding after taking loan of 500 crore from nationalized banks
Next Stories
1 ‘पीएनबी’ घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोप
2 साहित्यिकांची संमेलनाकडे पाठ!
3 निर्भीड विचारांची सरकारला भीती
Just Now!
X