लांबवरच्या अंतरापर्यंत अवजड सामान वाहून नेऊ शकणारे व कठीण धावपट्टीवर सहजरित्या उतरू शकणारे ‘सी-१७’ विमान भारतीय वायुसेनेत संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांच्या हस्ते दिल्लीजवळील हिंडन हवाई तळ येथे औपचारिकरित्या दाखल करण्यात आले.
भारतीय वायुसेनेच्या दृष्टिकोनामधून हे विमान अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे. सीमावर्ती भागातील पर्वतीय भागामध्ये सामानाची वाहतुक करण्यासाठी हे विमान उपयोगी ठरणार आहे. भारतीय वायुसेनेला सी-१७ विमानातून एका वेळेस तब्बल ७० टन वजनी सामानाची वाहतूक करता येईल.