मध्य प्रदेशातील राजगढ येथे रविवारी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा काढणाऱ्या भाजपा कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये चकमक उडाल्याचं चित्र पहायला मिळालं. राजगढच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांनी १४४ कलम लागू असल्याने भाजपा कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण भाजपा कार्यकर्त्यांनी मागे हटवण्यास नकार दिला. यानंतर जिल्हाधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. यादरम्यान निधी निवेदिता यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. यामुळे आंदोलन अजूनच चिघळलं. पोलिसांसोबत जिल्हाधिकारीदेखील आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होत्या. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये दोघे जखमी झाले.
१४४ कलम लागू असल्याने भाजपा कार्यकर्त्यांना सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यास नकार देण्यात आला होता. मात्र यानंतर भाजपा कार्यकर्ते आंदोलनासाठी एकत्र आले होते. राजगढच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आणि पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण आंदोलकांनी मागे हटण्यास नकार दिला. यादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
राजगढ़ में नागरिकता कानून के समर्थन में निकली रैली में कलेक्टर ने जड़ दिये बीजेपी कार्यकर्ता पर थप्पड़! @ndtvindia @shailendranrb @ajaiksaran #UPBJYMSUPPORTSCAA #CAA_NRCProtests #CAA2019 pic.twitter.com/ZlSDIakesv
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) January 19, 2020
यादरम्यान महिला अधिकाऱ्यांसोबत असभ्य वर्तन झाल्याचंही समोर आलं. उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा गर्दीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांनी काही आंदोलकांना जमिनीवर बसण्यास सांगितलं. यामध्ये त्या काही आंदोलकांना कानाखाली मारतानाही दिसत आहेत.
Madhya Pradesh: FIR registered against two persons for hitting and pulling hair of Rajgarh Deputy Collector Priya Verma during a demonstration held by BJP workers in support of #CAA in Rajgarh yesterday. One accused arrested. https://t.co/jqGhpBcGDJ
— ANI (@ANI) January 20, 2020
यानंतर प्रिया वर्मा यांना भाजपा कार्यकर्त्यांनी घेरलं. त्यांचं केस खेचण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामध्ये दोघं जखमी झाले. दरम्यान प्रिया वर्मा यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 12:10 pm