News Flash

CAA : दिल्लीतील हिंसाचारास ‘काँग्रेस व आप’ जबाबदार : जावडेकर

चुकीची माहिती पसरवून वातावरण खराब केल्याबद्दल जनतेची माफी मागावी, असे देखील म्हटले.

सुधारित नागरिकत्व कायद्या विरोधात राजधानी दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारास काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला काँग्रेससह अन्य पक्षांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर टिप्पणी केली आहे. दिल्ली सारख्या शांततामय शहरात सुधारित नागरिकत्व कायद्या बद्दल चुकीची माहिती पसरवून जे वातावरण निर्माण करण्यात आले व येथील संपत्तीचे जे नुकसान झाले, त्यासाठी काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार आहे, त्यांनी जनतेची माफी मागायला हवी. असे जावडेकर यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील नागरिकांना हे पाहून आश्चर्य वाटत आहे की, येथील साडेचार वर्षे झोपा काढत असलेलं आम आदमी पक्षाचे सरकार आता निवडणुकीच्या सहा महिने अगोदर प्रयत्न करत आहेत. मात्र दिल्लीतील आगामी निवडणुकीत भाजपा संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 2:42 pm

Web Title: caa congress and aap responsible for delhi violence javadekar msr 87
Next Stories
1 नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईची फटका
2 काही पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करत आहेत : मायावती
3 मल्ल्याची संपत्ती विकून बँका करणार वसुली; PMLA कोर्टानं दिली मंजुरी
Just Now!
X