News Flash

CAA विरोधी आंदोलनातील चेहरा टाइम्स मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पुन्हा स्थान

CAA विरोधी आंदोलनातील चेहरा टाइम्स मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत

टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत सीएएला विरोध करणाऱ्या शाहीन बागच्या आजी (दादी) म्हणजेच बिल्कीस यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.

सीएएच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे करण्यात आलेल्या आंदोलनात ८२ वर्षीय बिल्किस यादेखील आंदोलक म्हणून त्य़ा ठिकाणी होत्या. कोणी गोळीही चालवली तरी एक इंचही मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान, बिल्कीस यांना टाइम्सनं प्रभावशाली १०० जणांच्या यादीत स्थान दिलं आहे. टाइम्सच्या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता यांच्या नावाचाही यात समावेश करण्यात आला आहे.

आणखी वाचा- जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत असणारे रविंद्र गुप्ता आहेत तरी कोण?

टाइम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रातील १०० प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येतं. यावेळ अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्‍साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, टाइम मॅगझिननं मोदींबाबत मतही व्यक्त केलं आहे. “लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक स्वतंत्र निवडणुकाच नाही. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे ज्यांनी विजेत्याला मत दिलं नाही. भारत गेल्या ७ दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे,” असं टाइम मॅगझिननं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 2:41 pm

Web Title: caa oppose old lady bilkis got place in time magazine 100 influential people list jud 87
Next Stories
1 गोल्डन गर्ल: फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह ‘राफेल’च्या पहिल्या महिला फायटर पायलट
2 जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत असणारे रविंद्र गुप्ता आहेत तरी कोण?
3 “मोदींनी काँग्रेसने मेहनतीने मिळवलेले मित्र तोडले, आजूबाजूला मित्रराष्ट्र नसताना…”; राहुल गांधींचे ट्विट
Just Now!
X