News Flash

कागदपत्र दाखवणार नाही, कागदपत्र मागाल तर छाती दाखवू मारा गोळी : ओवेसी

मोदी-शाह यांच्याविरोधात जो आवाज उठवेल तो खऱ्या अर्थाने मर्द-ए-मुजाहिद ठरेल, असंही म्हटले आहेत

सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) विरोधात ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं आहे. मी देशातच राहील, कागदपत्र दाखवणार नाही. कागदपत्र मागाल तर छाती दाखवू मारा गोळी, असं ओवेसी म्हणाले आहेत.

“जो मोदी-शाह यांच्याविरोधात आवाज उठवेल तो खऱ्या अर्थाने मर्द-ए-मुजाहिद ठरेल. मी देशातच राहील, कागदपत्र दाखवणार नाही. कागदपत्र मागितली तर छाती दाखवू मारा गोळी. हृदयावर गोळी मारा कारण हृदयात भारताचे प्रेम आहे.” असं ओवेसींनी म्हटलं आहे.

या अगोदर ओवेसींनी लोकसभेत बोलताना, सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) नागरिकत्व देतोपण आणि घेतोपण असे म्हटले होते. तसेच, आसाममध्ये ५ लाख मुस्लीमांची नावं नाही आलीत. मात्र आसाममधील बंगाली हिंदूंना नागरिकत्व देऊ इच्छित आहेत… मी घुसखोर नाही घुसखोरांचा बाप आहे.. एनपीआर-एनआरसी एकच आहे. असही ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 10:50 am

Web Title: caa we will not show documents owaisi msr 87
Next Stories
1 भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध ठरत नाही : संघ
2 ‘..तर निम्मा बांगलादेश रिकामा होईल’
3 आरक्षण बंधनकारक नाही!
Just Now!
X