02 March 2021

News Flash

वाढदिवशी एक्स गर्लफ्रेंडने फोन केला नाही म्हणून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

२६ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस होता. ती फोन करेल असा त्याला विश्वास होता.

बर्थ डे च्या दिवशी पूर्व प्रेयसीने शुभेच्छा दिल्या नाही म्हणून एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्नाटकातील चिक्काबल्लापूरा जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली. चिक्काबल्लापूरा जिल्ह्यातील बांदाहल्ली गावात राहणाऱ्या एम. शिवाकुमारचे प्रेयसी बरोबर ब्रेकअप झाले होते. बुधवारी शिवाकुमारने त्याचा वाढदिवस साजरा केला.

बर्थ डे च्या दिवशी निदान पूर्वप्रेयसी शुभेच्छा देण्यासाठी फोन करेल किंवा मेसेज पाठवेल अशी त्याची अपेक्षा होती. पण तिने शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून हताश झालेल्या शिवाकुमारने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. शिवाकुमारकडे स्वत:च्या मालकीची टॅक्सी आहे. गावी परतण्यापूर्वी २०१७ ते २०१९ दरम्यान तो येलाहंका येथे रहायचा.

येलाहंकामध्ये असताना, त्याचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध जुळले. “शिवाकुमारला त्या तरुणीबरोबर लग्न करायचे होते. कुटुंबियांचाही त्यांच्या लग्नाला विरोध नव्हता. पण शिवाकुमारने गावी परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा, त्यांच्यात मतभेद निर्माण झाले” असे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. आईच्या आजारपणामुळे शिवाकुमारने गावी परतण्याचा निर्णय घेतला होता.

“चिक्काबल्लापूरामध्येही बऱ्यापैकी पैसे कमवत असल्याचे त्याने त्याच्या प्रेयसीला सांगितले होते” अशी माहिती सूत्रांनी दिली. तरुणीला गावी यायचे नव्हते पण ती पुन्हा आयुष्यात येईल अशी शिवाकुमारला अपेक्षा होती. २६ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस होता. ती फोन करेल असा त्याला विश्वास होता. पण तिचा फोन आला नाही. त्यामुळे निराश झालेल्या शिवाकुमारने घराच्या एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतला व गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:33 pm

Web Title: cabbie hangs himself as ex lover fails to wish him on birthday karnataka dmp 82
Next Stories
1 फेसबुक, ट्विटर, गुगलची पाकिस्तानला धमकी
2 कॅमेऱ्याचा अ‍ॅंगल आवडला नाही, लग्नात व्हिडीओग्राफरची गोळया झाडून हत्या
3 राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवारांसह ‘यांचं’ नाव
Just Now!
X