09 August 2020

News Flash

हवाई वाहतुकीच्या नव्या धोरणाला कॅबिनेटची मंजुरी; प्रवाशांसाठी फायदेशीर सुविधा

देशांर्तगत हवाई वाहतुक क्षेत्रातील संधी ओळखून त्याचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.

civil aviation policy : ऑक्टोबर २०१५ मध्ये धोरणाचा सुधारित मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र, काही नियमांमुळे या धोरणाला मंजुरी मिळण्यात अडचण येत होती.

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंगळवारी नागरी हवाई वाहतुकीच्या नव्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. या नव्या धोरणानुसार हवाई प्रवासाचे दर कमी होण्याची शक्यता असून प्रवाशांना अनेक सुविधांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ३ जून रोजी हे धोरण केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये रालोआ सरकारकडून पहिल्यांदा या धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये धोरणाचा सुधारित मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र, काही नियमांमुळे या धोरणाला मंजुरी मिळण्यात अडचण येत होती.
नव्या धोरणातील तरतुदीनुसार एका तासाच्या हवाई प्रवासासाठीचे भाडे अडीच हजारापर्यंत सिमीत करण्यात येणार आहे. याशिवाय, देशांर्तगत हवाई वाहतुक क्षेत्रातील संधी ओळखून त्याचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. स्वस्त विमानप्रवास, एकतर्फी वाहतूक हक्कांचा लिलाव, हवाई कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात करात सूट यांसारख्या तरतुदींचाही नव्या धोरणात समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2016 2:27 pm

Web Title: cabinet clears civil aviation policy expect better fares passenger friendly amenities
Next Stories
1 महाराष्ट्रातील ३ पर्यटकांचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू
2 ‘उडता पंजाब’वरून पंजाबमधील स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात
3 दिघ्यातील बेकायदा इमारतींच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती
Just Now!
X