News Flash

झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षांची बंदी, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बेकायदा कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. यापूर्वी स्वंयसेवी संस्थांना थेट विदेशी निधी मिळत होता. गृह मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विदेशी निधी घेण्यापूर्वी परवानगीची अट घातली होती. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला विदेशातून मिळणाऱ्या निधीच्या चौकशीचेही आदेश दिले होते.

तरुणांना दहशतवादाकडे वळविण्यासाठी त्यांचे ब्रेन वॉश केल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्याने आपण झाकीर नाईकच्या भाषणांना प्रेरित झाल्याचे म्हटले होते. तेव्हापासून झाकीर नाईक वादाच्या भोवऱयात सापडला आहे. पीस टेलिव्हिजनचाही झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंध असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

मध्यंतरी केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’मध्ये काम करणाऱ्या अर्शी कुरेशी  या व्यक्तीस इसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी नाईक याच्या संदर्भातला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. या अहवालात झाकीर नाईक यांच्या संस्थेतून अनेक बेकायदा कृत्ये केली जात असल्याचे समोर आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 8:29 pm

Web Title: cabinet decides five year ban on islamic research foundation
Next Stories
1 शिक्षिकेने वर्गात फरफटत नेल्याने विद्यार्थ्याचा हात मोडला
2 रतन टाटांसाठीच जास्त पैसे खर्च झाले; सायरस मिस्रींचा पलटवार
3 केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला, अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीतच?
Just Now!
X