काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी करोनावरून सातत्याने केंद्र सरकावर तोफ डागली आहे. मग ती जाहीर सभांमधून असो किंवा त्यांच्या ट्विटर हँडलवरून असो. केंद्र सरकारच्या करोनाविषयक धोरणावरून त्यांनी अनेक प्रश्न त्यांच्या ट्विटर हँडलवरून उपस्थित केले आहेत. मात्र, गुरुवारी त्यांनी केलेल्या अशाच एका ट्वीटवर केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. तसेच, राहुल गांधी यांना त्यांची चूक दाखवून देण्यासाठी त्यांनी थेट संत कबीर यांचा एक दोहाच ट्वीट केला आहे! शिवाय राहुल गांधींना गैरसमज न पसरवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

“समझने वाले समझ गए होंगे”

हिंदी भाषेत केलेल्या या ट्वीटमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचं ट्वीट देखील टॅग केलं आहे. “कहत कबीर – बोया पेड बबूल का, आम कहाँ से होय. समझने वाले समझ गए होंगे. केंद्र सरकार ने पहले से ही Walk-in रजिस्ट्रेशन के लिए राज्यों को स्वीकृति दे दी है. भ्रम ना फैलाए, टीका लगवाए”, असं ट्वीट स्मृती इराणी यांनी केलं आहे. हे ट्वीट इराणी यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केलं होतं. तर सकाळी साडेदहाच्या सुमारास राहुल गांधी यांनी ट्वीट केलं होतं.

baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
tejasvi surya marathi news, tejasvi surya nagpur marathi news
“मोदींमुळे बेरोजगार झालेल्या काँग्रेस नेत्यांकडूनच बेरोजगारीवर बोंबाबोंब”, तेजस्वी सूर्या म्हणाले…
sanjay raut narendra modi (3)
“केंद्राने मोदींबरोबर असहकाराची भूमिका घेतल्यावर शरद पवारांनीच…”, राऊतांकडून पंतप्रधानांच्या जुन्या वक्तव्यांची उजळणी
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक
smriti irani tweet on rahul gandhi
स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना ट्विटरवरून खोचक टोला लगावला आहे.

“सिर्फ ऑनलाईन रजिस्ट्रेशन काफी नही”

राहुल गांधी यांनी ट्वीट करून करोना लसीकरणासाठीच्या रजिस्ट्रेशनविषयी मुद्दा उपस्थित केला होता. “वॅक्सिन के लिए सिर्फ ऑनलाईन रजिस्ट्रेशन काफी नहीं. वॅक्सिन सेंटरपर वॉक-इन करनेवाले हर व्यक्ति को टीका मिलना चाहिए. जीवन का अधिकार उनका भी है जिनके पास इंटरनेट नहीं है”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावरून स्मृती इराणी यांनी खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

 

वॉक-इन लसीकरणावर ओवैसींचंही ट्वीट!

दरम्यान, राहुल गांधींनी ट्वीट केल्यानंतर स्मृती इराणी यांच्याआधी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करून केंद्र सरकारच्या वॉक-इन लसीकरणाच्या सुविधेचं कौतुक केलं. “मी वारंवार हे सांगत आलो आहे की सरकारने नोंदणीसाठी कोविन अॅपवर अवलंबून राहू नये. सर्वोच्च न्यायालयाने देखील कोविन अॅपवरील सक्तीमुळे देशात मोठा वर्ग लसीकरणापासून वंचित राहात असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे थेट केंद्रावर येऊन नोंदणी करण्याची मुभा देणारी नियमावली केंद्र सरकारने जारी केल्याचं समाधान आहे”, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

 

जगभरात ८ लशींचा बोलबाला!; करोना विषाणू रोखण्यासाठी ठरताहेत प्रभावी

सर्वांना मोफत लसीकरण

येत्या २१ जूनपासून सर्व राज्यांना १८ ते ४४ वयोगटासाठी देखील लसी मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासाठीच्या लसीचे डोस केंद्र सरकार स्वत: खरेदी करून राज्य सरकारांना देणार आहे. ४५पासून पुढच्या वयोगटासाठी याआधीच केंद्र सरकारतर्फे मोफत लसीकरण केलं जात आहे. मात्र, आता १८ ते ४४ वयोगटातल्या सामान्य नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारला कोणताही खर्च करावा लागणार नाही.