नरेंद्र मोदी – पंतप्रधान (उत्तर प्रदेश)

राजनाथ सिंह – लखनऊ (उत्तर प्रदेश)

अमित शहा- गांधीनगर (गुजरात)

नितीन गडकरी- नागपूर (महाराष्ट्र)

सदानंद गौडा- बेंगळूरु उत्तर (कर्नाटक)

निर्मला सीतारामन- (कर्नाटक) राज्यसभा

रामविलास पासवान- लोकजनशक्ती पक्ष (बिहार)

नरेंद्र सिंह तोमर- मुरियाना- (मध्य प्रदेश)

रविशंकर प्रसाद- पटनासाहेब (बिहार)

हरसिमरत कौर बादल- बठिंडा (पंजाब) अकाली दल

थावरचंद गेहलोत- शहाजहानपूर (उत्तर प्रदेश)

एस. जयशंकर

रमेश पोखरियाल निशांक- हरिद्वार (उत्तराखंड)

अर्जुन मुंडा- झारखंड

स्मृती इराणी- अमेठी (उत्तर प्रदेश)

डॉ. हर्ष वर्धन – चाँदनी चौक (दिल्ली)

प्रकाश जावडेकर- (महाराष्ट्र) राज्यसभा

पीयूष गोयल- (महाराष्ट्र) राज्यसभा

धर्मेद्र प्रधान – (ओडिशा)

मुख्तार अब्बास नक्वी- (उत्तर प्रदेश) राज्यसभा

प्रल्हाद जोशी- धारवाड (कर्नाटक) नवे

महेंद्रनाथ पांडे चंदौली- (उत्तर प्रदेश)

अरविंद सावंत- मुंबई दक्षिण (महाराष्ट्र) शिवसेना

गिरिराज सिंह- बेगुसराय ( बिहार)

गजेंद्र सिंह शेखावत- जोधपूर (राजस्थान)

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार

संतोष गंगवार- बरेली (उत्तर प्रदेश)

इंद्रजीत सिंह राव – गुरुग्राम (हरयाणा)

श्रीपाद नाईक – गोवा उत्तर (गोवा)

डॉ. जितेंद्र सिंग दीक्षित-

उधमपूर (जम्मू-काश्मीर)

किरन रिजिजू- (अरुणाचल प्रदेश)

प्रल्हाद पटेल- दामोह (गुजरात)

आर. के. सिंह- आरा (उत्तर प्रदेश)

हरदीप सिंह पुरी- पंजाब

मनसुख मांडविया- (गुजरात) राज्यसभा

राज्यमंत्री

फग्गन सिंह कुलस्थी- मंडला ( मध्य प्रदेश)

अश्विनी कुमार चौबे- बक्सर (बिहार)

अर्जुन राम मेघवाल- बिकानेर (राजस्थान)

कृष्णन पाल गुर्जर- फरिदाबाद (उत्तर प्रदेश)

रावसाहेब दानवे- जालना (महाराष्ट्र)

जी किशन रेड्डी – सिकंदराबाद (तेलंगणा)

पुरुषोत्तम रुपाला- (गुजरात)राज्यसभा

रामदास आठवले- (महाराष्ट्र) राज्यसभा

निरंजन ज्योती- फतेपूर (उत्तर प्रदेश)

बाबूल सुप्रियो – असनसोल (पश्चिम बंगाल)

संजीव बलियाँ- मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)

संजय धोत्रे- अकोला (महाराष्ट्र)

सुरेश अंगाडी- बेळगांव (कर्नाटक)

अनुराग ठाकूर – (हिमाचल)

नित्यानंद राय- उदियारपूर (बिहार)

रतनलाल कटारिया- अंबाला (हिमाचल प्रदेश)

व्ही. मुरलीधरन- राज्यसभा (महाराष्ट्र)

रेणुका सिंह- सरगुजा (छत्तीसगढ)

सोम प्रकाश- होशियारपूर (पंजाब)

रामेश्वर तेली- दिब्रुगड (पश्चिम बंगाल)

प्रताप चंद्र सारंगी- बालासोर (ओडिशा)

कैलाश चौधरी- बारमेर (राजस्थान)

देबश्री चौधुरी- रायगंज ( पश्चिम बंगाल)

व्ही. के. सिंह- गाझीयाबाद (उत्तर प्रदेश)

नवे मंत्री

एस जयशंकर, रमेश पोखरियाल निशांक, प्रल्हाद जोशी, अरविंद सावंत, जी किशन रेड्डी, संजय धोत्रे, सुरेश अंगाडी, रेणुका सिंह, सोम प्रकाश, रामेश्वर तेली, प्रताप चंद्र सारंगी, कैलाश चौधरी, व्ही मुरलीधरन आणि देबश्री चौधरी

राज्यवार मंत्रिपदे

उत्तर प्रदेश- १२, महाराष्ट्र-८, बिहार-५, गुजरात-४, कर्नाटक-४, पंजाब-३, पश्चिम बंगाल- ३, मध्य प्रदेश-२, ओडिशा-२, हिमाचल प्रदेश-२, राजस्थान-२, अरुणाचल प्रदेश-१, जम्मू-काश्मीर- १, हरयाणा-१, उत्तराखंड-१, छत्तीसगढ-१, झारखंड-१, तेलंगणा-१, दिल्ली-१, गोवा-१

अमित शहा

गेली पाच वर्षे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शहा अत्यंत मुत्सद्दी मानले जातात. पक्षाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहा यांनी पक्षसंघटना बळकट केली. पक्षात तरुण कार्यकर्त्यांची संख्या वाढवली. पक्षवाढीसाठी उपयुक्त नसलेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या जागी तरुण रक्ताला वाव दिला. राज्या राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत शहा पोहोचल्यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळू शकले. अमित शहा यांना भाजपचे समर्थक आधुनिक चाणाक्य म्हणतात. गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य बनलेले शहा यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या पारंपरिक गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये मोदी सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. त्यांची ही कारकीर्द मात्र वादग्रस्त ठरली.

प्रतापचंद्र सारंगी

ओडिशासारख्या तुलनेत मागास राज्यातील बालासोर मतदारसंघातून खासदार बनलेले प्रतापतंद्र सारंगी यांनी गेली कित्येक वर्षे सामाजिक कार्यात घालवलेली आहेत. ६५ वर्षांच्या सारंगी यांना ओडिशाचे मोदी म्हटले जाते. सारंगी यांचा अध्यात्माकडे अधिक ओढा असून साधू बनण्यासाठी ते अनेकदा रामकृष्ण मठात गेले मात्र, आईची सेवा करावी असे त्यांना सुचवण्यात आले. त्यानंतर त्यांनी लोकसेवासाठी स्वतला झोकून दिले.  उडिया आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.

देबश्री चौधरी

पश्चिम बंगालमधील रायगंज या ग्रामीण मतदारसंघात देबश्री यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मातब्बर उमेदवार महम्मद सलीम यांचा पराभव केला आहे. रायगंजमध्ये खरी लढत सलीम आणि काँग्रेसच्या दीपा मुन्शी यांच्यात मानली जात होती. मात्र बाजी देबश्री यांनी मारली. भाजपच्या राज्य सरचिटणीस असलेल्या देबश्री यांनी २०१४ मध्येही लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी टिपू सुल्तान मशिदीचे शाही इमान मौलाना नूर उर रेहमान यांच्याविरोधात आंदोलन केले होते.

मुख्तार अब्बास नक्वी

भाजपचा जुनेजाणता मुस्लिम चेहरा असलेले मुख्तार अब्बास नक्वी यांनी वाजपेयी सरकारमध्येही काम केले आहे. मोदींच्या गेल्या मंत्रिमंडळात नक्वी अल्पसंख्याकविषयक खात्याचे मंत्री होते. कित्येक वर्षे त्यांनी पक्षाचे प्रवक्तेपदही सांभाळले आहे. भाजपच्या आक्रमक हिंदुत्ववादी राजकारणाच्या लाटेतही नक्वी भाजपमध्ये टिकून राहिलेले आहेत. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात नक्वी हे एकमेव मुस्लिम चेहरा आहेत. रामपूरमधून खासदार बनलेले नक्वी सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.

अनुराग ठाकूर

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ यांचे पुत्र. लोकसभेचे तिसऱ्यांदा सदस्य म्हणून निवडून आलेले अनुराग ठाकूर हे दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळात अधिक प्रसिद्ध आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते अध्यक्ष होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष असताना अनेक वादंग निर्माण झाले होते. त्यावरून सर्वोच्च न्यायालने त्यांची कानउघाडणी केल्यावर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.

सुब्रमण्यम जयशंकर

मोदी सरकारमधील अनपेक्षित आणि सर्वाना आश्चर्याचा धक्का देणारा समावेश म्हणजे भारताचे माजी परराष्ट्र सचिव सुब्रमण्यम जयशंकर यांचा. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी परराष्ट्र सचिवपद भूषविले होते व तेव्हा मोदी यांचा विश्वास संपादन केला होता. सुषमा स्वराज या परराष्ट्रमंत्री होत्या, पण परराष्ट्रविषयक सारे निर्णय हे पंतप्रधान कार्यालयातून घेतले जात असत. तेव्हा जयशंकर हे थेट पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार निर्णय घेत, अशी चर्चा होती. नव्या रचनेत त्यांच्याकडे परराष्ट्र खात्याचा कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता आहे. अमेरिका, चीन, रशिया, सिंगापूर अशा विविध देशांमध्ये राजदूतपद त्यांनी भूषविले आहे. भाजपशासित एखाद्या राज्यातून त्यांची राज्यसभेवर निवड केली जाईल कारण ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत.