ब्रिटनमधील ब्रेग्झिट जनमत चाचणीच्या निकालानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधानपदाच्या कारभाराची सुत्रे नसल्यामुळे त्यांना आता ब्रिटन सरकारचे डाऊनिंग स्ट्रीट स्थित सरकारी घरातून कॅमेरून यांना बाहेर पडावे लागणार आहे. माजी पंतप्रधान सरकारी निवासातून बाहेर पडताना त्यांच्या सोबत लॅरी नावाची मांजर देखील बाहेर पडणार का? याची सर्व बिटनवासियांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र, ब्रिटन सरकारच्या घरातून  कॅमेरुन बाहेर पडले तरी, लॅरी नावाचे मांजर सरकारी निवासात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लॅरीने  कॅमेरुन पंतप्रधानपदी असताना ब्रिटनच्या सरकारी निवासात प्रवेश केला होता. लॅरी ही कॅमेरुन यांची वैयक्तिक मांजर नसून ब्रिटन सरकारची असल्याने तिचा सरकारी निवासस्थानातील मुक्काम कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  २०११ मध्ये कॅमेरुन यांच्या निवास्थानातील उंदरांची संख्या कमी करण्याच्या हेतून लॅरीला पंतप्रधानाच्या निवासस्थानी आणले होते. लॅरी व्यतिरीक्त ब्रिटन पंतप्रधान निवास्थानात इतरही मांजरे आहेत. मात्र, लॅरी या सर्वांची प्रमुख आहे. कॅमेरुन यांच्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे या विराजमान झाल्या आहेत. त्यांच्यासोबत लॅरेनचा निवास कायम राहणार हे आता पक्के झाले आहे.