17 November 2017

News Flash

‘कोहिनूर’ परत देता येणार नाही – डेव्हिड कॅमेरून

ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतातून नेलेला कोहिनूर हिरा आता परत देता येणार नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान

अमृतसर | Updated: February 21, 2013 1:07 AM

ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतातून नेलेला कोहिनूर हिरा आता परत देता येणार नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुरुवारी स्पष्ट केले. कॅमेरून सध्या भारत भेटीवर आहेत. त्यांच्या भेटीचा तिसऱय़ा आणि शेवटच्यादिवशी त्यांनी कोहिनूर हिऱयाबाबत आपले मत व्यक्त केले.
सध्या लंडन टॉवरमध्ये ठेवण्यात आलेला कोहिनूर हिरा परत देणे आता शक्य नसल्याचे कॅमेरून यांनी येथे सांगितले. कोहिनूर भारताला परत द्यावा, अशी मागणी काही भारतीय नागरिकांनी केली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नातवानेही हा हिरा परत देण्याची मागणी केली होती. मात्र, कॅमेरून यांनी ती फेटाळली. कोणतीही वस्तू परत देण्यावर माझा विश्वास नाही. तसे करण्यात काहीही अर्थ नाही, असेही कॅमेरून यांनी म्हटले आहे. सन १८५० मध्ये त्यावेळच्या गव्हर्नर जनरलने यांनी कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरिया हिला दिला होता.

First Published on February 21, 2013 1:07 am

Web Title: cameron says kohinoor in royal crown is ours and will not be returned