News Flash

चांद्रवीर एडगर मिशेल यांचे निधन

चंद्रावर आतापर्यंत केवळ बारा लोक प्रत्यक्ष चाललेले होते

चंद्रावर आतापर्यंत केवळ बारा लोक प्रत्यक्ष चाललेले होते, त्यांच्यापैकी एक असलेले अवकाशवीर एडगर मिशेल यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. नासाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, विशेष म्हणजे चांद्र अवतरणास नुकतीच ४५ वर्षे पूर्ण झाली असून दुर्दैवाने त्याच सुमारास मिशेल यांचे फ्लोरिडा येथे निधन झाले. मिशेल हे १९७२ मध्ये नासातून निवृत्त झाले होते. मिशेल १९७१ मध्ये अपोलो १४ मोहिमेत अ‍ॅलन शेफर्ड ज्युनियर व स्टुअर्ट रूसा यांच्या समवेत चंद्रावर गेले होते. चंद्रावर प्रत्यक्ष चाललेल्या अपोलो मोहिमेतील अखेरचा अवकाशवीर काळाच्या पडद्याआड गेला आहे. नासाचे प्रशासक चार्लस बोडेन यांनी सांगितले की मिशेल यांनी चंद्रावरून पृथ्वीचे छायाचित्र टिपले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:15 am

Web Title: candravira edgar mitchell passes away
Next Stories
1 शरीफ यांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी दाऊदला भेटले!
2 शनिशिंगणापूरचा वाद मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात
3 प्रसिद्ध गायिका शान जॉन्सनचा मृत्यू
Just Now!
X