सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाटी दहा हजार कोटी एकरकमी भरणे अशक्य असल्याचे विधान सहारा समुहाने सर्वोच्च न्यायालयासमोर केली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश के.एस.राधाकृष्णन आणि जे.एस.खेहर यांनी सहारासमुहाचा युक्तीवाद फेटाळून लावला आणि जामीन हवा असेल तर १० हजार कोटी जमा करण्याच्या निर्णयवर ठाम असल्याचे म्हटले. यानुसार सहाश्रींना पुन्हा आठवडाभर तुरूंगातच रहावे लागणार आहे कारण, पुढील सुनावणी येत्या ३ एप्रिल रोजी होणार आहे.
सुब्रतो रॉय यांच्या जामीनासाठी १० हजार कोटी रुपये भरण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आवश्यक रकमेचा बंदोबस्त करता यावा यासाठी सहाराची गोठविण्यात आलेली बँक खातीही खुली करण्याची तयारीही न्यायालयाने दाखविली होती. यासाठी १० हजार कोटींपैकी ५ हजार कोटी रुपये न्यायालयातच जमा करावेत, तर उर्वरित ५ हजार कोटी रुपये राष्ट्रीयीकृत बँकेच्या हमीसह भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे जमा करण्यास सांगण्यात आले होते. ही रक्कम उभारता यावी यासाठी गोठविण्यात आलेले सहारा समूहातील बँक खातीही खुली करण्याची सहाराच्या वकिलांची मागणी न्यायालयाने मान्य केली होती. परंतु, आज(गुरुवा) सहारा समुहाने न्यायालयासमोर रक्कम मोठी असल्याचे एकरकमी भरणे अशक्य असल्याचे म्हटले.