माजी मंत्री आझम खान यांच्यार हजरतगंज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. RSSला बदनाम केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मंत्री असताना आझम खान यांनी सरकारी लेटरपॅड आणि शिक्क्याचा दुरूपयोग करत आरएसएसला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्याचे काम केल्याचा आरोप त्यांच्यार ठेवण्यात आला आहे.

हे प्रकरण चार वर्षांपूर्वी समाजवादी पार्टीचे उत्तरप्रदेशमध्ये सरकार असतानाचे आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक राधारमण सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, २०१४ मध्ये सामाजिक कार्यकर्ता अल्लामा जमीर नकवी यांनी केलेल्या तक्रारीत आझम खान यांच्या सहा लेटपॅड जोडत. सामाजिक आणि धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप लावला आहे.

आरएसएससोबत शिया धर्मगुरु मौलाना कब्जे जव्वाद आणि सचिव इमरान नकवी यांचाही अपमान केला आहे, तक्रारकर्ते अल्लामा जमीर नकवी यांचा आरोप आहे. आझम खान यांच्यासोबत शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांच्यावरही आरएसएसला बदनाम केल्याचा आरोप आहे.