हिंदू दहशतवादाबाबत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विधानांविरोधात येथे फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी डी.डी. ओझा यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. न्यायमूर्तीनी सदर खटल्याच्या सुनावणीपूर्वी आपापली बाजू मांडण्यासाठी उभयपक्षांना १२ तारखेपर्यंतची मुदत दिली आहे.
काँग्रेसच्या जयपूर येथे भरलेल्या चिंतन शिबिरामध्ये २० जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विजय बहादूर सिंग यांनी मथुरा येथील न्यायालयात गुन्हेगारी खटला दाखल केला होता.