28 September 2020

News Flash

हैदराबादसारख्या घटनांची थेट सुप्रीम कोर्टात सुनावणी व्हावी; शिवसेना खासदाराचे लोकसभेत निवेदन

"सध्याची कायदेशीर प्रक्रिया ही खूपच संथ असून ती कनिष्ठ न्यायालयापासून सुरु होऊन पुढे सुरुच राहते. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळण्यास उशीर होतो."

(संग्रहित छायाचित्र)

हैदराबाद एन्काऊंटरने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले असून यावर अनेक खासदारांनी लोकसभेत चर्चेदरम्यान आपली मतं मांडली आहेत. यामध्ये, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील आपले मत मांडले आहे. “हैदराबाद सारख्या घटनांची थेट सुप्रीम कोर्टातच सुनावणी व्हावी” अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकसभेत बोलताना खासदार सावंत म्हणाले, “महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांचे खटले हे थेट सुप्रीम कोर्टात चालवले जावेत यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. सध्याची कायदेशीर प्रक्रिया ही खूपच संथ असून कनिष्ठ न्यायालयापासून सुरु होऊन ती पुढे सुरुच राहते. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळण्यास उशीर होतो. म्हणून माझे लोकसभा अध्यक्षांना आवाहन आहे की त्यांनी असे गुन्हे थेट सुप्रीम कोर्टात चालवण्याबाबत चर्चेसाठी एक समिती नेमावी.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 1:05 pm

Web Title: cases like hyderabad to be heard directly in supreme court shiv sena mps statement in lok sabha aau 85
Next Stories
1 “भविष्यात ‘असं’ दुष्कृत्य करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे”
2 #HyderabadEncounter : “एन्काऊंटर चुकीचा; पोलिसांवर गुन्हा दाखल करा”
3 #HyderabadEncounter : “अखेर न्याय मिळाला”; दाक्षिणात्य कलाकारांकडून पोलिसांचं कौतुक
Just Now!
X