एअर इंडियामध्ये गेल्या काही वर्षांपासून काही तर तब्बल सात वर्षांपासून सुमारे ४०० कर्मचारी कामवरून बेपत्ता असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यात ५० वैमानिकांसह २०० ‘कॅबिन क्रू’ कर्मचाऱयांचा समावेश आहे. तसेच इतर कर्मचारी इतर विभागाशी संबंधित आहेत.
‘ड्रीमलायनर’च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह
एअर इंडियात करण्यात आलेल्या अंतरिम तपासणीत ही बाब समोर आली आहे. बेपत्ता कर्मचाऱयांना ते बेपत्ता असल्यापासूनचा पगार जरी देण्यात आलेला नसला तरी, देशाच्या हवाई सेवेतील ही घटना दखल घेण्यासारखी आहे. त्यातील काही कर्मचारी तब्बल २००६ सालापासून कंपनीतून बेपत्ता आहेत. तरी कर्मचारी बेपत्ता असल्याची नोंदही एअर इंडियाने घेतलेली नाही. संबंधित कर्मचाऱयांनी कंपनी सोडून जात असल्याचेही सांगितलेले नाही.
फुंकून टाकाच!
तसेच सलग तीस दिवस कामावर गैरहजर राहणाऱयांना नोटीस बजाविण्याचा कंपनीचा नियम असतानाही अजून नोटीस बजावण्यात आलेली नाही. आता त्यांना नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
सद्य:स्थिती खडतर असली भारतीय हवाई क्षेत्राचे भवितव्य आशादायी : बोइंग