देवेगौडा यांचे वर्चस्व कायम; जागा कायम राखण्यासाठी काँग्रेस व भाजपचा संघर्ष

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रभावक्षेत्र असलेल्या तुमकूर जिल्ह्य़ात जातीय समीकरणेच प्रभावी ठरण्याचे चित्र दिसत आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही जिल्ह्यात जनता दल आघाडीवर राहील अशी चिन्हे आहेत. काँग्रेस व भाजपला येथे जनता दलाशी संघर्ष करावा लागणार आहे.

Congress Raigad, Congress suffer in Raigad,
रायगडात काँग्रेसची वाताहत सुरूच
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
MP Navneet Rana
…तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद
Kashi Jagadguru in Solapur
सोलापुरात काशी जगद्गुरूंचा आशीर्वाद प्रणितीला की रामाला ? दावे-प्रतिदाव्यांमुळे चविष्ट चर्चा

बंगळुरुपासून ७० किलोमीटरवर तुमकूर शहर आहे. बंगळुरु-पुणे राष्ट्रीय महार्गावरुन जाताना बंगळुरुची हद्द कधी संपते व तुमकूर कधी सुरु होते हेच कळत नाही. कारण या मार्गावर फारशी रिकामी भूखंड किंवा शेती नाही. त्यामुळे अधून-मधून छोटय़ा-मोठय़ा गावांच्या पाटय़ा फक्त बदलतात.  बंगळुरु शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक मोठी गोदामे या मार्गावर आहेत. राष्ट्रीय महार्गावरून मालाची वाहतूक करणे त्यामुळे सोपे होते. या मार्गावर दुतर्फा मोठी हॉटेल व दुकाने आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत  जिल्ह्य़ातील ११ जागांपैकी सहा जागांवर धर्मनिरपेक्ष जनता दल तर काँग्रेसला चार व भाजपला एक जागा मिळाली होती. या भागात वोक्कलींग समुदाय मोठय़ा प्रमाणात आहे. देवेगौडा वोक्कलींग असून, हा समाज जनता दलाची मतपेढी मानली जाते. तिथे लिंगायत समाजही मोठय़ा संख्येने आहे. बऱ्याच प्रमाणात तो भाजपचा पाठिराखा आहे. तर मुस्लिम व मोठय़ा प्रमाणात अनुसुचित जाती -जमातींची मते काँग्रेसच्या पारडय़ात जातील, असे या येथील एका जाणकाराने सांगितले. विकासकामांपेक्षा जातीच्या आधारावर मतदान होणे चुकीचे असल्याचे मत त्याने व्यक्त केले.

तुमकूरच्या अलिकडे पाच किलोमीटर लिंगायत समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा श्री सिद्धगंगा मठ आहे. कर्नाटकच्या राजकारणावर मठ, मंदिरांचा मोठा प्रभाव आहे. सिद्धगंगा मठात जवळपास नऊ हजार विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस कर्नाटकच्या सिद्धरामैय्या सरकारने केली  आहे. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे, याबाबत मठाचे प्रशासकीय अधिकारी एस. विश्वनाथैय्या यांना विचारले असता, लिंगायत व वीरशैव एकच आहेत असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारच्या निर्णयाला विरोध केला. अर्थात आमचा राजकारणाशी काही संबध नाही, मठात सर्व पक्षाचे नेते येतात. स्वामीजी त्यांना आशिर्वाद देतात असे त्यांनी स्पष्ट केले.

श्री शिवकुमार स्वामींच्या दर्शनासाठी नेत्यांची रिघ

श्री सिद्धगंगा मठाचा प्रभाव मोठा आहे. अनेक राजकीय नेते इथे येतात. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अलिकडेच या मठाला भेट दिली. या मठाचा परिसर सुमारे २०० एकरात वसलेला आहे. रोज हजारो भाविकांसह काही बडे नेते येथे येतात आणि १११ वर्षांच्या श्री शिवकुमार स्वामींचे दर्शन घेतात. लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याबाबत दर्शनासाठी आलेल्या एका तरुणाला विचारले असता, ही  सिद्धरामैय्या यांची निर्थक उठाठेव आहे, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.