News Flash

धक्कादायक! अपघातानंतर बसने मृतदेह ७० किमी फरफटत आणला

बसचा चालक अटकेत

धक्कादायक! अपघातानंतर बसने मृतदेह ७० किमी फरफटत आणला

एका बसने एका माणसाला धडक दिली. या धडकेत त्या माणसाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा मृतदेह बसच्या खालच्या भागात अडकला जो बसने एक दोन नाही सुमारे ७० किमी पर्यंत फरफटत आणल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये घडली आहे. बसला धडकून एका माणसाचा मृत्यू झाला त्या माणसाचा मृतदेह लटकून बससोबत आला तरीही आपल्याला यासंबंधी काहीही ठाऊक नसल्याचा दावा या बसचा चालक मोहिनुद्दीनने केला आहे.

मोहिनुद्दीनने तामिळनाडूतील कुन्नूरहून बंगळुरु डेपोपर्यंत नॉन एसी स्लीपर बस चालवत आणली. मात्र बसखाली मृतदेह लटकला आहे हे आपल्याला ठाऊकच नव्हते असे त्याने म्हटले आहे. म्हैसूर-मांड्या-चन्नपट्टा मार्गावरून मी बस बंगळुरूच्या दिशेने घेऊन येत होतो त्याचवेळी बसला काहीतरी धडकून मोठा आवाज झाल्याचे माझ्या लक्षात आले. पण आरशात काहीही दिसले नाही. त्यामुळे तो एखादा भलामोठा दगड असावा असे मला वाटले आणि बस चालवत राहिलो अशी कबुली चालक मोहिनुद्दीनने दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. तर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

बंगळुरूला ही बस रात्री २ च्या नंतर पोहचली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी सकाळी बस धुताना चालकाला हा मृतदेह दिसला त्याचवेळी हा मृतदेह फरफटत आला असल्याचे त्याला समजले. सध्या हा मृतदेह व्हिक्टोरिया रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. हा मृतदेह साधारण ४५ वर्षाच्या माणसाचा आहे पण त्याची ओळख पटलेली नाही. अंगावर काटा आणणारा हा प्रकार बंगळुरुमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2018 2:08 pm

Web Title: caught under karnataka bus body dragged 70 km
Next Stories
1 ‘मोदी केअर योजने’ला बिगर भाजपाशासित राज्यांचा विरोध
2 ‘पाकिस्तानच्या एका गोळीला असंख्य गोळयांनी उत्तर देऊ’
3 चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा, भाजपाची डोकेदुखी वाढणार?
Just Now!
X