24 October 2020

News Flash

करदात्यांना दिलासा ; इन्कम टॅक्स रीटर्नसाठी मुदत वाढवली

३१ जुलै ऐवजी आता ३१ ऑगस्ट असणार अंतिम तारीख

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ने आज आयकर विवरणपत्र (आयटीआर) फाइल करण्यासाठी अगोदर निर्धारित केलेली ३१ जुलै ही तारीख वाढवून आता ३१ ऑगस्ट केली आहे. इन्कम टॅक्स विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे.

आयकर विवरणपत्र फाइल करण्याच्या ३१ ऑगस्ट या अंतिम तारखेनंतर दंड देखील द्यावा लागू शकतो. त्यामुळे अंतिम तारखेच्या आतच आयटीआर फॉर्म फाइल करणे फायद्याचे राहणार आहे. यासाठी फॉर्म १६ आणि पॅन कार्डसारख्या अन्य कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे याची मुदत वाढवण्याची मागणी होत होती.

आयटीआर प्रत्येकवर्षी फाइल करणे बंधनकारक आहे. आयटीआर फाइल केला नाहीतर आयकर विभागाकडून नोटीस अथवा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 10:00 pm

Web Title: cbdt extends the due date for filing of income tax returns msr 87
Next Stories
1 कर्नाटकातील राजकीय नाट्याचा समारोप ; काँग्रेस – जेडीएसचं सरकार कोसळलं
2 एमटीएनएल, बीएसएनलमधील आगीच्या घटनांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
3 ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावावर भारताची प्रतिक्रिया आश्चर्यकारक – इम्रान खान
Just Now!
X