News Flash

ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळा: माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना सीबीआयकडून अटक

ऑगस्टा वेस्टलॅण्डकडून झाली होती हेलिकॉप्टरची खरेदी

माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी (संग्रहित छायाचित्र)

ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांना अटक केली आहे.  भारताने इटलीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड या कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी केले होते. या खरेदीप्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून सीबीआयने त्यागी यांच्यासह दिल्लीतील वकील गौतम खैतान आणि संजीव त्यागी या दोघांनाही अटक केली आहे.

ऑगस्टा वेस्टलॅण्डकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटींचे  हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यात आले होते. या व्यवहारात दलाली देण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी यांची सीबीआयने चौकशीही केली होती. इटलीतील मिलानच्या भारतीय उच्च न्यायालयाशी समकक्ष असलेल्या न्यायालयाने फिनमेकॅनिका व ऑगस्टा वेस्टलँड या कंपन्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना मध्यस्थांमार्फत कंत्राट मिळवण्यासाठी कशा प्रकारे दलाली याचा उल्लेख केला होता. त्या निकालात त्यागी यांचे नाव वारंवार घेण्यात आले होते. ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीस फायदा दिला जावा, यासाठी एस. पी. त्यागी यांना काही निधी दिल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्यामुळे सीबीआयने त्यागी, त्यांचे १३ नातेवाईक आणि युरोपातील मध्यस्थाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी सीबीआयने त्यागी यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. करार पूर्णत्वास जाण्यासाठी आर्थिक मोबादला घेणाऱ्या दलालाने केलेल्या आरोपांच्या आधारावर तपासा केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

माजी हवाई दल प्रमुख त्यागी यांनी हेलिकॉप्टर्सची विशिष्ट उंचीवरून उडण्याबाबतची अपेक्षा ६००० मीटर ऐवजी ४५०० मीटर केल्याने ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीला हे कंत्राट मिळू शकले. पण हा निर्णय विशेष सुरक्षा गट व पंतप्रधान कार्यालय तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के.नारायणन यांच्या सल्लामसलतीने झाला होता. सीबीआयने असा आरोप केला आहे, की उंची कमी केल्याने या कंपनीला हेलिकॉप्टर्स पुरवण्याच्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 5:37 pm

Web Title: cbi arrests former air chief sp tyagi in agustawestland case
Next Stories
1 जिल्हा बँक जुन्या नोटा स्वीकारु शकणार की नाही, सुप्रीम कोर्टाने मागितले सरकारकडून उत्तर
2 भारतात येणार प्लास्टिक नोटा; सरकारची माहिती
3 नोटाबंदीचा निर्णय फसल्यास संपूर्ण जबाबदारी माझी- पंतप्रधान मोदी
Just Now!
X