हैदराबादस्थित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांची ४७३६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने हैदराबादस्थित कोस्टल प्रॉजेक्ट्स लि. ही कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कंपनीने २०१३ ते २०१८ या कालावधीत खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्रे तयार केली असल्याचा आरोप एसबीआयने नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रवर्तकांच्या सहभागाबद्दलही कंपनीने चुकीची माहिती दिली आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले.
सीबीआयने कंपनीच्या संचालकांच्या हैदराबाद आणि विजयवाडा येथील निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले असून आक्षेपार्ह दस्तऐवज आणि अन्य साहित्य जप्त केले आहे, असेही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 1:20 am