नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक वर्मा शुक्रवारी केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांच्यासमोर चौकशीसाठी उपस्थित राहिले. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू असून, लागोपाठ दोन दिवस वर्मा यांनी उपस्थित राहून प्रश्नांना उत्तरे दिली.

अस्थाना यांनी केलेले सर्व आरोप वर्मा यांनी फेटाळले आहेत. वर्मा यांच्या चौकशीसाठी दक्षता आयुक्त टी. एम. भसीन,  शरद कुमार तसेच मुख्य दक्षता आयुक्त चौधरी यांची समिती नेमण्यात आली होती. ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. के. पटनायक यांच्या देखरेखीखाली होत असून, त्यांना चौकशीवेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. वर्मा हे केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळीच उपस्थित झाले. तासभर त्यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यालयाबाहेर पत्रकार जमलेले होते, पण त्यांनी कुठलेही भाष्य केले नाही.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड

सर्वोच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी अस्थाना यांनी केलेल्या आरोपाबाबत सीबीआय संचालक वर्मा यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाला दिले होते आणि दोन आठवडय़ांत चौकशी पूर्ण करण्यास सांगितले होते. दोन आठवडय़ांची मुदत रविवारी संपत असून सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सोमवारी सुनावणी ठेवली आहे. वर्मा व अस्थाना यांनी एकमेकांवर आरोप केले असून त्या दोघांनाही सरकारने रजेवर पाठवले आहे. वर्मा यांच्याशिवाय अस्थाना हे गुरुवारी केंद्रीय दक्षता आयोगाच्या कार्यालयात हजर होते. त्यांनी वर्मा यांच्यावर केलेल्या आरोपांचे लेखी पुरावे सादर केल्याचे समजते. अस्थाना यांच्या तक्रारीत ज्या सीबीआय अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत त्या सगळय़ांना बोलावण्यात आले होते.