News Flash

भ्रष्टाचाराविरोधात सीबीआयची विशेष मोहिम; देशभरात १५० ठिकाणी छापेमारी

संभाव्य भ्रष्टाचाराच्या तपासणीसाठी या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

भ्रष्टाचारविरोधात विशेष मोहिमेचा भाग म्हणून सीबीआयने देशभरातील १५० विविध सरकारी संस्थांच्या कार्यालयांवर अचानक छापेमारी केली. संभाव्य भ्रष्टाचाराच्या तपासणीसाठी या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

देशभरातील ज्या शहरांमध्ये सीबीआयने छापेमारी केली आहे त्यामध्ये दिल्ली, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाँग, चंदीगड, शिमला, चेन्नई, मदुराई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, पुणे, गांधीनगर, गोवा, भोपाळ, जबलपूर, नागपूर, पाटणा, रांची, गाझियाबाद, डेहराडून आणि लखनऊ या शहारांचा समावेश आहे.

या शहरांमधील ज्या सरकारी कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली ती अशी कार्यालये आहेत जिथे सर्वसामान्य नागरिक किंवा छोट्या व्यावसायिकांना व्यवस्थेतील भ्रष्ट कारभारामुळे सर्वात जास्त नुकसान भोगावे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 6:48 pm

Web Title: cbi conducted a special drive under which 150 places joint surprise checks across the country aau 85
Next Stories
1 अर्थव्यवस्थेला झटका, पहिल्या तिमाहीतला जीडीपी ५ टक्क्यांवर
2 काश्मिरी बहिंणीशी लग्न करणाऱ्या बिहारमधील दोघा भावांना अटक
3 रेल्वे प्रशासनाकडून केळ्यांवर बंदी, कारण….
Just Now!
X