अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात यापुढे कोणताही तपास केला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे. जियाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोली याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी त्याची आणखी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जियाची आई राबिया खान यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली.

जियाच्या मृत्यूनंतर सूरज आणि त्याचे वडील अभिनते आदित्य पांचोली यांच्यावरही बरेच आरोप लावण्यात आले होते. राबिया यांनी आदित्य पांचोलीसह इतर दोन व्यक्तींवर आरोप लावत त्यांच्या फोनमधील माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचीही मागणी केली होती. न्यायालयाने राबिया यांची ही मागणी फेटाळली असली तरीही सूरज आणि जियादरम्यान ब्लॅकबेरी मेसेंजरवरुन झालेले बोलणे न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. मात्र, तो जामिनावर सुटला होता. जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. याप्रकरणी सूरजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं आरोपपत्र सीबीआयने दाखल केले होते.