केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या आता तपास संस्था राहिलेल्या नाहीत तर भाजपाच्या सहयोगी भागीदार संस्था झाल्या आहेत, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. लालूजी सध्या तुरुंगात आहेत कारण, मोदींना ते धोकादायक वाटत असल्याचे ते म्हणाले.


यादव म्हणाले, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोनच पक्ष भाजपाचा पराभव करण्यासाठी सक्षम आहेत. राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमधूनही ते दिसून आलं आहे. यावर राहुल गांधींनीही म्हटले होते की, भाजपाला युपीत जागा मिळवणे कठीण आहे. मात्र, त्यासाठी कोणाची युती झालीय हे महत्वाचं नाही.

त्यामुळे राष्ट्र हितासाठी एकत्र आल्याबद्दल मी मायावती आणि अखिलेशजी यांच स्वागत करतो. ब्रिटिशांच्या काळात त्यांचे गुलाम असणारे आज सत्तेत आहेत. ही परिस्थिती उजेडात आणण्याची गरज होती, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.