03 March 2021

News Flash

कुमारमंगलम बिर्ला यांचीही चौकशी

तालाबिरा-२ कोळसा खाणक्षेत्राचे हिंदाल्कोला वाटप केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नुकतीच चौकशी केल्यानंतर सीबाआयने बुधवारी या वाटपासाठी सिंग यांना दोनदा पत्रे लिहिणारे उद्योजक कुमारमंगलम

| January 22, 2015 02:18 am

तालाबिरा-२ कोळसा खाणक्षेत्राचे हिंदाल्कोला वाटप केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नुकतीच चौकशी केल्यानंतर सीबाआयने बुधवारी या वाटपासाठी सिंग यांना दोनदा पत्रे लिहिणारे उद्योजक कुमारमंगलम बिर्ला यांची चौकशी केली. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष असलेले कुमारमंगलम बिर्ला हे कोळसा खाणवाटप घोटाळ्यातील एक आरोपी असून २००५मध्ये त्यांनी पाठविलेली पत्रे व सिंग यांचा त्यामधील सहभाग, याबाबत अधिक तपासाची गरज नसल्याचे सांगत सीबीआयने विशेष सीबीआय न्यायालयात १६ डिसेंबरला ‘क्लोजर रिपोर्ट’साठी परवानगी मागितली होती. न्यायालयाने मात्र ती नाकारली होती. तसेच सिंग यांची चौकशी करण्यास फर्मावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 2:18 am

Web Title: cbi examines kumar mangalam birla
टॅग : Cbi
Next Stories
1 केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला
2 संघानेच देशाला एकसंध ठेवले!
3 केजरीवाल, बेदी, माकन यांचे अर्ज दाखल
Just Now!
X