NDTVचे प्रवर्तक प्रणय रॉय यांच्याविरोधात आर्थिक घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास पथकाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर रॉय यांची पत्नी राधिका रॉय, NDTVचे माजी सीईओ विक्रम चंद्रा आणि इतर लोकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी सीबीआयने १० ऑगस्ट रोजी प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका यांना मुंबई विमानतळावर परदेशात जाण्यापासून रोखले होते. हे दोघेही नैरोबीला निघाले होते त्याचवेळी सीबीआयने त्यांना रोखले होते. दरम्यान, NDTVकडून रॉय यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगत दोन वर्षांपूर्वीचे हे खोटे प्रकरण असल्याचा दावा केला आहे. फसवणूकप्रकरणी सीबीआयने प्रणय रॉय यांच्या विविध मालमत्तांवर दोन वर्षांपूर्वी छापेमारीही केली होती.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रणय रॉय यांच्याविरोधात कट रचणे, फसवणूक करणे तसेच भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमांतून त्यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.