01 March 2021

News Flash

सीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली

निरीक्षक कपिल धनकड यांनी पोलीस उपअधीक्षक आर. के. संगवान आणि आर. के. ऋषी यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

लाचखोरीप्रकरणी सीबीआयच्या ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत त्या अधिकाऱ्यांना तपासामध्ये तडजोड करण्यासाठी केवळ नियमितपणे दलालीच मिळत नव्हती तर हे अधिकारी जनतेच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या कंपन्यांच्या वतीने अन्य अधिकाऱ्यांनाही लाच देत होते, असा आरोप या अधिकाऱ्यांविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

सीबीआयने याप्रकरणी छापे टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर असे आढळले की, निरीक्षक कपिल धनकड यांनी पोलीस उपअधीक्षक आर. के. संगवान आणि आर. के. ऋषी यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतले आहेत. श्री श्याम पल्प अ‍ॅण्ड बोर्ड मिल्सने बँकेची ७०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे तर फ्रॉस्ट इंटरनॅशनलने बँकेची ३६०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे या कंपन्यांवर संगवान आणि ऋषी यांची मेहेरनजर होती, असे आठ पानांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

संगवान, ऋषी, धनकड आणि लघुलेखक समीरकुमार यांनी अरविंदकुमार गुप्ता आणि मनोहर मलिक व अन्य आरोपींसमवेत कारस्थान रचले आणि आर्थिक लाभासाठी तपासात हयगय  केली, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:42 am

Web Title: cbi officials brokered by companies abn 97
Next Stories
1 अमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना
2 केंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी
3 चर्चेची नववी फेरी निष्फळ
Just Now!
X