अभिनेता संजय दत्त याला एके- ५६ रायफल देणारा १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हनीफ कडावाला याच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला असून या प्रकरणी गँगस्टर छोटा राजन याला आरोपी बनवले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून सीबीआयने या प्रकरणाचा तपास स्वीकारला आहे. नियमांनुसार, राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे सीबीआय तपास सुरू करत असते.

maharashtra andhashraddha nirmulan samiti marathi news
महाराष्ट्र अंनिसने निवडणुकीतील उमेदवारांवर कारवाईची मागणी का केली ?
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार
Deepali Chavan Suicide
विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

कडावाला खून प्रकरणाच्या संबंधात छोटा राजन, त्याच्या टोळीचा सदस्य गुरू साटम व इतरांविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांनुसार तसेच शस्त्रास्त्रे कायद्याखाली प्रकरण दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत २५७ लोक ठार, तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले होते. टायगर मेमनच्या सूचनेवरून हनीफने ही शस्त्रे गुजरातवरून मुंबईला आणली होती. कटात सहभागी होणे आणि गुजरात किनाऱ्यावरून शस्त्रे मुंबईला आणणे यासाठी त्याला १६ एप्रिल १९९३ रोजी ‘टाडा’ कायद्याखाली अटक करण्यात आली होती. पाच वर्षांनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.