CBSE 10th Result 2019 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण ४.४० टक्क्यांनी वाढले आहे. यंदा दहावीचा निकाल ९१. १ टक्के लागला आहे. पास होण्याचे प्रमाण दरवर्षी कमी होण्याची २०१४ पासूनची प्रथा यंदा खंडित झाली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला निकाल लागला आहे. अर्थात, २०१७ चा विचार केला तर यंदा लागलेला निकाल तसा कमीच आहे. २०१७ मध्ये यंदाच्या ९१. १ टक्क्यांच्या तुलनेत जास्त म्हणजे ९३.०६ टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

यंदाच्या वर्षी निकालात ९९.८५ टक्केंसह त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. तर महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल ९९ टक्के लागला असून हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. ९५.८९ टक्क्यांसह अजमेर तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा निकालात मुलींनी बाजी मारली. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या मुलींचे प्रमाण २.३१ टक्क्यांनी जास्त आहे. यंदा, इयत्ता १० वीमध्ये एकूण १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून संयुक्तरित्या अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर, २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवले आहेत.

परीक्षेसाठी बससेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईट http://www.cbse.nic.in. वर जाऊनही निकाल पाहू शकता. याशिवाय cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याआधीच दुपारी २ वाजता सीबीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला.

असा पाहा निकाल –

पहिली पायरी – cbse.nic.in या वेबसाइटवर जा
दुसरी पायरी – CBSE 10th Result 2018
ही लिंक शोधा व तिच्यावर क्लिक करा
तिसरी पायरी – आपला रोल नंबर भरा
चौथी पायरी – तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करा म्हणजे तो तुम्हाला नंतरही उपयोगी येऊ शकेल.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेला देशभरात १८ लाख विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ८८.६७ टक्के इतकं होतं. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण ४.४० टक्क्यांनी वाढले आहे. यंदा दहावीचा निकाल ९१. १ टक्के लागला आहे.