News Flash

CBSE बोर्डाच्या १०वा, १२वी पेपरच्या तारखांमध्ये बदल! वाचा बदललेल्या तारखा!

CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये काही पेपरच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.

CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये काही विषयांच्या पेपरच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सीबीएसईच्या वेबसाईटवर परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार १०वीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या पेपरच्या तारखा बदलून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यासोबतच १२वीच्या फिजिक्स, इतिहास आणि बँकिंग या विषयांच्या पेपरच्या तारखा देखील बदलण्यात आल्या आहेत. बदललेल्या तारखांचं नवीन वेळापत्रत सीबीएसईच्या cbse.nic.in या संकेतस्थावर देखील देण्यात आलं आहे.

काय आहेत बदल?

नव्या वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाचा १०वीचा विज्ञान विषयाचा पेपर २१ मे रोजी घेण्यात येणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार या दिवशी गणिताचा पेपर होता. गणित विषयाचा पेपर २ जून रोजी घेण्यात येणार आहे. सीबीएसई १२वीच्या परीक्षांमध्ये फिजिक्स विषयाचा पेपर ८ जून रोजी घेण्यात येणार आहे. बँकिंगचा पेपर ९ जून रोजी तर इतिहासाचा पेपर १० जून रोजी घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 5:43 pm

Web Title: cbse board exams 10th 12th paper date sheet changed pmw 88
Next Stories
1 आत्ताच वाद का? २०१३ मध्ये पण असे घडले होते; सीतारामन यांचे स्पष्टीकरण
2 दुष्काळात तेरावा महिना! आखाती देशांनी घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे इंधन दरवाढ अटळ?
3 दिलासादायक बातमी… करोना लसीकरण अधिक स्वस्त, झटपट होणार; भारत बायोटेकच्या Nasal Vaccine ची चाचणी लवकरच
Just Now!
X