News Flash

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पुणे विभाग टॉप ५ मध्ये

सीबीएसई दहावी परीक्षेत महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के

संग्रहित

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना उत्सुकता असलेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात थोडी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे.

यंदा १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी पास झाले आहेत. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी निकाल जाहीर होईल अशी घोषणा केली होती. विद्यार्थी www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. विद्यार्थी संकेतस्थळाशिवाय एसएमएस, डिजीलॉकर आणि उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकणार आहेत.

टॉप ५ विभागांमध्ये पुणे चौथ्या स्थानी
सीबीएसई दहावीच्या निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल ९९.२८ टक्के लागला आहे. त्या पाठोपाठ चेन्नई दुसऱ्या (९८.९५ टक्के निकाल), बंगळुरू तिसऱ्या (९८.२३ टक्के निकाल) तर पुणे चौथ्या (९८.०५ टक्के निकाल) स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर अजमेर (९६.९३ टक्के निकाल) विभाग आहे.

 

निकास कसा पहायचा –

१) cbse.nic.in , www.results.nic.in , www.cbseresults.nic.in या वेबसाईट्सवर पाहू शकता
२) डिजीलॉकर अ‍ॅप
३) उमंग अ‍ॅप
४) एसएमएस – टाइप ‘CBSE10 (स्पेस) (रोल नंबर) (स्पेस) (ऍडमिट कार्ड आयडी)’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:49 pm

Web Title: cbse class 10 exam results announced sgy 87
Next Stories
1 “सर्वांनी सचिन पायलट यांचे आभार मानायला हवेत”; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निर्णयावर भाजपाची टीका
2 राजस्थान विधानसभेत आकडे कोणासाठी अनुकूल? कोणाचं पारडं जड? समजून घ्या
3 ६८ हजार कोटींची पगारवाढ… ‘या’ देशाने आरोग्य कर्मचाऱ्यांना अनोख्या पद्धतीने म्हटलं Thank You
Just Now!
X