सीबीएसईचा इयत्ता १० वी आणि १२ वीचे पेपर फुटले होते. हे पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता १० वीचा गणित विषयाचा आणि इयत्ता १२ वीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परीक्षेच्या संदर्भात आलेल्या तक्रारींवरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्याप या दोन्ही परीक्षांची तारीख जाहीर कऱण्यात आलेली नसून ती येत्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.

या संदर्भातील माहीती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट कऱण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. दहावीची परीक्षा चार एप्रिलला संपणार असून १२ वीची परीक्षा १२ एप्रिलला संपणार आहे. १२ वीचा अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्च रोजी घेण्यात आला होता. तो देशात काही ठिकाणी हा पेपर लीक झाला होता. त्याचप्रमाणे १० वीचा गणिताचा पेपरही काही ठिकाणी लीक झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यावरुन हे पेपर पुन्हा घेतले जातील असे सीबीएसईकडून जाहीर करण्यात आले होते. या दोन्ही वर्षांच्या परीक्षा ५ मार्च रोजी सुरु करण्यात आल्या होत्या. यामध्ये १० वीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३८ हजार ४२८ विद्यार्थी बसले होते. तर १२ वीच्या परीक्षेसाठी ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थी बसले होते. १२ वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरबरोबरच दिल्लीमध्ये जीवशास्त्राचा पेपर फुटल्याची चर्चा होती. मात्र तपासणीअंती हे खोटे असल्याचे समोर आले होते.