सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या बारावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारलीये. देशात परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ८७.९८ टक्के तर मुलांचे प्रमाण ७७.७८ टक्के इतके आहे. सीबीएसईचे बारावीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आले. सीबीएसईच्या वेबसाईट्वर हे निकाल ऑनलाईन उपलब्ध आहेत.
यंदा एकूण ८२ टक्के विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सीबीएसईच्या निवेदनात म्हटले आहे. यंदा एकूण ९,४४,७२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १५.८१ टक्क्यांनी वाढ झालीये. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चेन्नई विभागाची कामगिरी सर्वोत्कृष्ठ ठरलीये. या विभागातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.८३ इतकी आहे.