केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०१७ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परिक्षेचा NEET निकाल घोषित केला आहे. विद्यार्थ्यांना cbseneet.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. पंजाबच्या नवदीप सिंग देशातून पहिला आला आहे. त्यानं AIR 1 श्रेणीसह एकूण ७०० पैकी ६९७ गुण मिळवले आहेत. मध्य प्रदेशचा अर्चित गुप्ता ६९६ गुण मिळवून देशात दुसरा आला आहे. तर मनीष मुलचंदानी देशातून तिसरा आला आहे.

यावर्षी जवळपास १२ लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. त्यातील १०.५ लाख विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेतून परीक्षा दिली होती. तर १.२५ लाख विद्यार्थ्यांनी इतर आठ भाषांची निवड केली होती. यावर्षी नीट परीक्षा दहा भाषांमध्ये घेण्यात आली होती.

असा पाहा निकाल:

cbseneet.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

NEET 2017 result and rank या लिंकवर क्लिक करा.

पेज ओपन झाल्यानंतर आपला परीक्षा क्रमांक आणि इतर माहिती टाकावी.

निकालाची प्रिंटही तुम्हाला काढता येणार आहे.