CBSC बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या ज्या परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या या परीक्षा आता १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. ट्विटवर एक व्हिडीओ ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. सीबीएससी बोर्ड १० आणि १२ वीच्या उर्वरित परीक्षा घेणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार आता ही घोषणा करण्यात आली आहे. मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकाडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत.