26 February 2021

News Flash

Air Strike नंतर पाकिस्तानकडून गोळीबार, नियंत्रण रेषेजवळ पाच जवान जखमी

खबरदारीचा उपाय म्हणून सीमारेषेजवळ रहाणाऱ्या गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासही सुरुवात झाली आहे

संग्रहित छायाचित्र

जम्मू काश्मीरच्या अखनूर केरी भागात पाक सैन्याने हल्ला आणि गोळीबार केला आहे. नियंत्रण रेषेजव भारताचे पाच जवान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. दोन्हीकडून गोळीबार केला जातो आहे. अजूनही हा गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानकडून लोकांच्या घरांवरही गोळीबार केला जातो आहे, तसेच मिसाईल हल्लाही केला जातो आहे. या हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जातं आहे.  भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला. राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार केला. कृष्णा घाटी भागातही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानने जगभरातल्या प्रसारमाध्यमांना हवाई हल्ला झाला त्या ठिकाणी भेट देण्याचं आवाहन केलं आहे. भारतातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हवाई हल्ला करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. दरम्यान पाकिस्तानकडून जो गोळीबार केला जातो आहे त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. सीमाभागात गोळीबार सुरु आहे. नौशेरा आणि राजौरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला करारा जवाब दिला जातो आहे अशी माहिती लेफ्ट. कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली.

सध्या सीमा भागात जो गोळीबार आणि लष्कराची कारवाई सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर पाच सीमारेषेपासून पाच किमी अंतरावर असलेल्या परिसरातल्या सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची बुधवारी परीक्षा आहे तीदेखील रद्द करण्यात आली असून ही परीक्षा नंतर घेतली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांच्याबाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जे लोक सीमारेषेजवळ रहात आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचंही काम सुरु आहे अशीही माहिती समजते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 11:17 pm

Web Title: ceasefire violation by pak army in keri area of akhnoor of loc 5 army jawan injured
Next Stories
1 भारताच्या हवाई हल्ल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानकडून सीमेजवळ गोळीबार
2 भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानात भारतीय चित्रपट, जाहिरातींना बंदी
3 ‘ही’ लष्करी नव्हे तर दहशतवादविरोधी कारवाई; सर्वपक्षीय बैठकीतील सूर
Just Now!
X