News Flash

शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन पाकिस्तानी सैनिक ठार

सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. वारंवार बजावून देखील पाकिस्तानने आपल्या कुरपती थांबलेल्या दिसत नाही. आज देखील पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार झाला. यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. शिवाय पाकिस्तानी सैनिकांचे एक तळ देखील उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती आहे.

पलांवाला सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले व दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले. भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांचे एक तळ देखील उद्धवस्त झाले.

याशिवाय एनएनआय़ वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील कंझालवान सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानकडून मोठ्याप्रमाणावर गोळीबार केला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 2:51 pm

Web Title: ceasefire violation by pakistan in tangdhar and kanzalwan sector in jammu and kashmir msr 87
Next Stories
1 #CAA: तुझी दाढी खेचून काढू, पत्रकार ओमर राशिदचा पोलिसांच्या ताब्यात असतानाचा अनुभव
2 विसरू नका २००२ मध्ये काय झालं; कर्नाटकातील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
3 CAA मुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता -पवार
Just Now!
X