06 July 2020

News Flash

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन

जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला करून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केले. मात्र सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या सैनिकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

| July 13, 2014 01:14 am

जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला करून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केले. मात्र सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या सैनिकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानच्या रेंजरनी लहान शस्त्रांनी पिंडी सीमेवरील पट्टय़ात हल्ला चढविला, मात्र सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करणाऱ्या भारतीय जवानांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. या चकमकीत कोणीही मरण पावल्याचे वृत्त आलेले नाही, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याचा जुलै महिन्यातील हा दुसरा प्रकार आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी १ जुलै रोजी भारतीय ठाण्यांवर स्वयंचलित शस्त्रांनी जोरदार हल्ला चढविला होता. जून महिन्यातही पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2014 1:14 am

Web Title: ceasefire violation on loc by pakistan 2
टॅग Pakistan
Next Stories
1 दिल्ली भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सतीश उपाध्याय
2 ‘दिलेली माहिती वारंवार मागवता येणार नाही’
3 अफगाणिस्तानात मध्यस्थीस अमेरिका तयार
Just Now!
X